मला भेटली परी
होती ती खरी खुरी
पांढरे शुभ्र वस्त्र तिचे
हातात होती छडी
पंख तिचे मखमली
उडे कसली भारी
मला ही सोबत नेले
घेतली आकाशी भरारी
फिरलो आम्ही कुठे कुठे
इकडे तिकडे हवे जिथे
झाडा वेली फुलांमध्ये
झरणे वाहतात तिथे
पक्षांबरोबर बागडलो
प्रण्यांबरोबर वावरलो
वाघ येता जंगला मध्ये
छडी फिरवून गायब झालो
किती किती मज्जा केली
समुद्राची सैर केली
माश्यांबरोबर खेळलो
थकून भागून घरी आलो
कुकरची शिटी वाजली
पटकन जाग मला आली
परी कुठेच नाही दिसली
स्वप्नात ती होती भेटली...
*सचिन विश्राम कांबळे*
खुपच छान रचना केलीयस 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवावा खूप सुंदर परी 👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाव्वा व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवा