बाबा तुम्ही इतके
लांब का गेलात
शोधून शोधून थकलो
परत कधी येणार
इतके लांब ते
आहे कुठे मला सांगा
कंटाळा आलाय तुमच्या शिवाय
मग मी ही तिथेच येणार
तुमच्या शिवाय लाड माझे
दुसरे कोण करणार
रडलो जर का मी तर
उचलुन कोण घेणार
इकडे शोधू तिकडे शोधू
काहिच समजत नाय
तुमच्या शिवाय खाऊ
कोणी दुसरं देत नाय
पालक दिवस
शाळेत साजरे होतात
सगळ्यांचे बाबा असतात
पण माझेच बाबा नसतात
आई म्हणते बाबा त्या
आकाशात रहतात
रोज रात्री शोधत असतो
कुठेच नाही दिसतात
त्या ताऱ्या मध्ये बाबा तुझे
आई असेच सांगते
इतक्या जवळचे बाबांना माझ्या
मला दुरूनच पहावे लागते..
*सचिन विश्राम कांबळे*
खूप मस्त रचना भावस्पर्शी
उत्तर द्याहटवाVva khup chan lihili apratim rachana 👌
उत्तर द्याहटवाअतिशय भावपूर्ण..👌👌👍
उत्तर द्याहटवाखुपच भावनिक रचना 👌👌
उत्तर द्याहटवाडोळ्यातून अगदी अश्रु टपकले सर एवढी हृदयस्पर्शी रचना लिहिली 😥😥😥👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍✍️✍️✍️✍️✍️🙏🙏
उत्तर द्याहटवासुंदर रचना!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवा