असं पण असतं का बालपण
गेलं त्या निखाऱ्या उन्हानं करपून
होतं ते वय राहावं खेळून बागडून
पण कुणा ठाव कुठं गेलं ते हरवून
माय बाप नसता ना मिळे कुणाचे रक्षण
असं पण असतं का बालपण.......
किडी इवल्याश्या त्या पोटाला
नसता अन्न राहू लागे उपाशी
कशी निद्रा येईल त्या जीवास
एक रात्रीसाठी तुटले जे नाते शिताशी
कोण भरविल घास दाखवून आपलेपण
असं पण असतं का बालपण......
चटके बसत भाजून काडती
नसता पायात जोड
शिकण्याची जिद्द ठेऊन मनी
ऊन्हात चालली इवलीशी ती पोर गोड
मायेनं कधी तिचे होईल का पालन
असं पण असतं का बालपण......
जिद्द लागली ती एक त्या मनाला
विद्या घेईल मज आपल्या उराशी
मोठं होता ना होऊ कोणाची दासी
सारं काही असावं स्व हाताशी
संस्कार अंगी होती हीच शिकवणं
असं पण असतं का बालपण......
नको रे देवा देऊ दुःखाची आठवण
मौज मजा सुख दे तु भरभरून
झऱ्याचे गोड पाणी नको टाकू आटवून
नको रे देऊ देवा असे लहानपण
कुणा वाट्यास असं नको यावं बालपण.....
*सचिन विश्राम कांबळे*
खुप ह्रदयस्पर्शी , कटु वास्तवदर्शी रचना...मन हेलावून टाकणारी.... अप्रतीम , खुप छान लीहीलय...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाहृदयस्पर्शी 😥 खूप छान लेखनशैली 👌🏻👌🏻👌🏻🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखुप भावस्पर्शी लिहीलयस 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाहृदयस्पर्शी लेखन केले दादा ✍️👌👌
उत्तर द्याहटवाव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली हो अस्त असही बालपण खूप ठिकाणी खूप छान लिहिलंय
उत्तर द्याहटवाअतिशय हृदयस्पर्शी रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाभावस्पर्शी लिखाण... मनातले दुःसांगणारे ...👍👌✍️🍫
उत्तर द्याहटवाभावचिंतन काव्य!✍️������
उत्तर द्याहटवा