चिमणा चिमणी च ते घर
वाह बघ आहे किती सुंदर
चिमणा आणि दाणा
चिमणी भरवी पिलांना
किती छान ते राहतात
घरट्यात त्या आनंदात
पाहून मनात माझ्या येते
माझेही घरटे असावे इथे
देवा माझं घर कुठे हाय
आई बाबा ही कोण माहित नाय
मीच का असा अनाथ
आईबाबा द्यायचे नव्हते तुझ्या ध्यानात
चिमणीच्या पिलांना बघ
कसे आईबाबांना सांगतात
माझ्या मनाच्या संवेदना
तुला कश्या नाही कळतात
मीच का असं एकटं जगावे
मनातलं माझ्या कोणाला सांगावे
मायेनं जवळ बसवून घास मला
कोणी रे देवा भरवावे
तूच जगाचा कर्ता करविता
तुझ्याकडेच सर्व उत्तरे असतात
मायेचा ओलावा हवा मला
मलाही आईबाबा जवळ हवेसे वाटतात
नाही सहन होत रे आता देवा
त्यांच्या शिवाय कसं जगायचं
वेदना मनाला देवा खूप होतात
त्यांच्या माये वाचून आता नाही राहायचं
*सचिन विश्राम कांबळे*
Waa... खूप छान किती आर्त पणानी सांगत आहे तो मुलगा आपला दुःख ...की देवाला ही पाझर फुटावा...👌👍✍️🍫🍫🍫🍫🍫🍫🌹अप्रतिम रचना..
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद मानसी जी🙏🙏💐💐💐
हटवाअतिशय भावस्पर्शी रचना 👌👌👌👌👌👌
हटवाखुप छान 👌👌ह्रदयस्पर्शी रचना
उत्तर द्याहटवाव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली
उत्तर द्याहटवाखूपच भावस्पर्शी रचना👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवामंत्रमुग्ध करतात सर तुमच्या कविता माणसाला. एवढी वेदनामय आर्त हाक ऐकून तर देवाच्या काळजाला ही पाझर फुटावा
उत्तर द्याहटवा....... अतिशय उत्कृष्ट अशी लेखनशैली सर आपली अप्रतिमच 👌👌👌👌👌👌👌👌⭐⭐⭐⭐⭐👍👍👍👍✍️✍️✍️✍️🙏