काट्या कुट्याच्या रस्त्याने तु जाऊ नकोस,
वळसा पडला तरी सत्याची वाट तु सोडु नकोस,
कळस नको आधी पाया तु रच,
कितीही तरबेज असला तरी आखूड मार्ग निवडू नको
पाप कर्म तु करु नकोस,
चोरी लबाडी तु करु नकोस,
मेहनतीचा घास मिळवुनी खा तो तु सुखाने,
कितीही तरबेज असला तरी अपराधाकडे वळू नको
व्यसन तु करु नकोस,
पैसा तु उधळु नकोस,
संसाराची वाट तु लाऊ नकोस,
किती तरबेज असला तरी वाईट संगत करू नको
अंधश्रधेत तु राहु नकोस,
कोंबड्या ,बकरा यांचा बळी तु देऊ नकोस,
भामट्या फसव्या बुवांच्या नादी तु लागु नकोस,
किती तरबेज असला कर्मकांडात फसू नको
गर्व कसलाच तु करु नकोस,
आपल्याहुन लहानास कमी तु लेखु नकोस,
श्रीमंतीचा आस धरुन वाईट कर्म तु करु नकोस,
किती तरबेज असला तरी अहंकार तू बाळगू नको
पैसा, श्रीमंती आली जरी,त्याचे तु जतन कर,
मित्रमंडळी,नातेवाईक,गरीबांस तु मदत कर,
कुणा पडलेल्यास तु सावर,कुर्कम करणा-यासआवर,
किती तरबेज असला तरी उन्मत्तपणा दाखवू नको
तुझ्यापेक्षा लहानांनच्या विचारांना तु वाव दे,
लहान जरी असेल,त्यांचे तु मत घे,
सुखाच्या अवकाशात एकटा तुच विहार करु नकोस
किती तरबेज असला तरी फुशारक्या तू मारू नको
आखूड मार्गाने अनुभव मिळणार नाही
अपराध कडे वळशिल तर तुरुंगवास भोगशील
वाईट संगती करशील तर आयुष्य उद्ध्वस्त करशील
कर्मकांडात फसशील निष्पाप कुणाचा बळी घेशील
अहंकार करून जगशील जमिनीवर पडशील
कितीही तरबेज असशील तरी शिक्षे पासून कसा वाचशील
** सचिन विश्राम कांबळे **
खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
उत्तर द्याहटवासुंदरच खूपच छान लिखाण आणि विचार..👌
उत्तर द्याहटवाआबा 🙏
खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना आणि संदेश दिला आहे कवितेतून .👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतीम... खुप छान...��������
उत्तर द्याहटवाप्रेरणादायक रचना...��������
उत्तर द्याहटवाछान विचार मांडले ..!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाअप्रतिमच...👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम लिहिलंयस 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर विचार मांडले 👌
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा