कर तुला हवं ते मर्जीने
थोडं जगून बघ स्वतःसाठी
किती राब राबणार अशी
झिजणार तू दुसऱ्यासाठी
तू स्वतःच आपली करून घेतली
शून्य किंमत कौडी मोल
कारण गुमाण सारं सोसलं
झेलले झुकून ते कडवे बोल
शिक प्रत्युत्तर करायला
अधिकार तुलाही जगायला
नाही मिळालं घे हिसकावून
दाखव तुझ्यातलं बळ जगाला
चल उठ आता तरी हो जागी
परवानगी तुझीच आहे तुला
दाखव इंगा स्त्री शक्तीचा
मग कोण अडवेल मुक्त जगायला
खूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली
उत्तर द्याहटवासुंदर, सकारात्मक लेखन!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर लेखन केले ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेखन 👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर मांडली आहे स्त्री ची व्यथा....👌👍✍️🍫🍫🍫🍫🌹
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर..👌👌👍
उत्तर द्याहटवा