गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

खेळ मांडला

 धरतीचा कोप होऊनी हादरली ती माता

पाप केले का कोणते त्या जीवांनी

कंप तुझा हा वेगळाच प्रवास जीवांचा

थरकाप उडतो केला विचार जरी कोणी,


घरदार उध्वस्त झाले

कित्येक प्राणही गेले,

भांडी कुंडी संपूर्ण संसारच मोडून पडला

गुरं बांधलेली गोठ्यात तो गोठाच कुठे दडला,

किंकाळ्या आक्रोश गती ती मंद झाली

मरणास समोर बघून काय अवस्था असेल झाली,


उंच उंच इमारती जमीनदोस्त झाल्या

रक्तांच्या नद्या उगम पावल्या,

कोणी जिवांशी कोणी हाताशी पायाशी गेले

जीवन झाले ते लुळे पांगळे,


समुद्राला हि उधान आले

आले ते आले होते नव्हते सारे नेले,

भयंकर तो लाटांचा मारा

सागरही हद्द सोडून 

लढवयास बाहेर आला,

बलाढ्य तो सागर, बलाढ्य ती त्याची सेना

कोण लढेल त्याच्याशी 

एकही जीव आपले प्राण वाचवेना,


पावसानं न जाणो कोणता राग काढला

पाण्याचा जणू धबधबाच सोडला,

रस्त्यांच्या नद्या झाल्या

घराच्या चार भिंतीत नाचू लागल्या,


घरचे कर्ता करविता तर गेलेच

पण कुटुंबच्या कुटुंब गुदमरून मेले,

महापुराने गाव उध्वस्त झाले

शेती,गुरे वासरे काही माणसांनाही वाहून नेले,


अश्रू उभे राहतात डोळ्यात,

आठवल्यावर तो कहर

देवा,जीवांशी खेळण्याची 

ही कसली तुझी लहर,


कर जे तुला जे करायचंय ते

जो खेळ मांडायचा आहे तो मांड

सवय झाली आता या सगळ्याची

डोळ्यातलंही पाणी आटलंय आता

चिंताच नाही वाटत कशाची आता


फक्त बळ दे हे सारं सोसण्याच

मोडलेला संसार परत उभं करण्याचं

जीवांना घडवलं तूच

तूच ठेव सुखी

नको करुस दुःखी नको 

हवंय आम्हाला काही अवांतर.



**सचिन विश्राम कांबळे**



८ टिप्पण्या:

  1. सचिन तु वास्तव मांडले,तुझी लेखणी भारदार आहे

    उत्तर द्याहटवा
  2. खुप वास्तवदर्शी लिहीलयस 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...