आयुष्य हे
एक प्रवाह नदीचा
आईच्या गर्भात फुलतो
मधुर आवाजात उगम पावतो
नियतीच्या चक्रा नुसार जन्म होतो
खलखळणाऱ्या झऱ्यागत
खेळतो नाचतो बागडतो उड्या मारतो
बालपणाचा आस्वाद घेऊन
मनमौजी जगतो
छोट्या छोट्या साखळीने प्रवाह बनतो
अनेक छोटे मोठे ओढे
येऊन मिळतात
त्यांच्यात रमतो गमतो
बेधडक तरुणाईची बेधुंद मिजास जगतो
खूप मोठा प्रवाह बनतो
प्रत्येक वळणावर चढ उतार मिळतात
असंख्य बाधांचा अवरोध भेदून
एक नवीन संथ शीतल निर्मळ
प्रवाहाच्या शोधात निघतो
काटे कुटे पोटात घेऊन
प्रत्येक मार्ग मोकळा करत
एक नवजिवनात प्रवेश करतो
डोहा स्वरूपात
कुठे तरी जाऊन थांबतो अन् शांत होतो
खूप खोल डोह
त्यात भावना प्रेम काळजी लपलेली असते
कोणी त्याची खोली सांगु शकणार नाही
त्या भावना,प्रेम काळजी ओळखू शकणार नाही
कारण तो शांत पुढच्याप्रवसाची तयारी करत असतो
पुढे संथ वाहत वाहत
हळू हळू गती ती मंद होते
अन् प्रवास इथेच संपतो
शेवट त्या सरणावर होतो
प्रवाह सागरात विलीन होतो.....
शेवटी तुम्हाला देऊन जातो
दगड,वाळू बाष्प पाऊस पाणी
उदरनिर्व्हाचा बंदोबस्त करुन ठेवतो
धन संपत्ती,पैसा
इथेच सोडतो तुमच्या भविष्यासाठी
जे त्यांनी कमवलेला असतो
प्राणहीन देह तो ही
भक्ष म्हणून छोटे जीव किडे यांच्या स्वाधीन करतो
कुटे तरी पुण्य करतो
नाहीतर राख होऊन या मातीत मिसळून जातो
घेऊन जातो तो फक्त प्राण
जो तुमच्यावर कधीतरी
ओवाळून टाकलेला असतो....
*सचिन विश्राम कांबळे*
अप्रतिम अप्रतिमच रचना 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवागणेश दळवी 🙏🏼
खुप सुंदर जीवनाचा प्रवास दर्शवला आहे....👌👍✍️🍫🌹खूप छान सचिन
उत्तर द्याहटवाखूपच छान सचिन 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर सुरेख जीवन प्रवास वर्णन केलं आहे 👌👌👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना केली . सुंदर शब्दात आयुष्याचा प्रवास सांगितलं 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर जीवन प्रवास👌👌👌👌
उत्तर द्याहटवाक्या बात है "सच्चू"
उत्तर द्याहटवाखूपच छान अप्रतिम लेखनशैली सुंदर पेशकश 👌
🍧🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
अतिशय अप्रतिम रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवा