मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

परिस्थितीची शिकवणं

 

वाईट परिस्थिती आमची होती
काय वेळ वाईट होती ती
नशिबावर हक्क गाजवून
काय होती मिरवत ती

तुटके फुटके गाळ जीवनी
तडजोड का आमच्या नशीबी
श्रीमंती कुठे होती दडली
वाटणीस आली ती गरिबी

दप्तर होतं आशेनं भरलेलं
पण झोळी आमची रिकामी
कसं तरी पोट भरी आमचं.. आई
भाग्य आमचं मात्र निकामी

कुणा दप्तरतून असता पडले
तुकडे तुकडे गोळा करू खडू
परिस्थितीस पाठीवर मारून
कोसळत होतं रडू

एक पाटी होती फक्त
वही ती एक एक कागद बहुमोली
गरीबीच होतं डोक्यावर ओझं
हात होते खाली

मास्तर जेव्हा काढी पुस्तक
शिकवण्यास धडा
पुस्तकं नव्हती आमच्या हाती
भरून होता डोक्यात बुध्दीचाच घडा

चोर नजरेनं पाहत होतो
डोकावून बाजूच्या पुस्तकात
काय करावं कसं शिकावं
का गरीब आम्ही जन्मजात

पुढे सरलो मागे ना वळलो
गरिबीचे घोटून पाणी
चटके सोसत उन्हात चाललो
पायतान नसता बहीण भाऊ अनवाणी

हात पसरला ना कुणा पुढे
कितीही संकटं आली जरी
खूप शिकलो पुढे गेलो मोठे झालो
परस्थितीच्या शिकवणीनं अन् बुद्धीच्या बळावरी.

*सचिन विश्राम कांबळे*


१३ टिप्पण्या:

  1. अतिशय वास्तववादी रचना, खूप भावस्पर्शी रचना👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान वर्णन केले आहे...!!
    पुर्वीचे दिवस खूप बिकट होते पण ते खूप अविस्मरणीय होते...!!
    पण सगळेच दिवस सारखे नसतात हे नियती दाखवून देतेच...! नाही का ?
    पण खूप छान लिहिले आहे..👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा
  3. वास्तववादी कविता नियत्ती सर्व दिवस दाखवते....दुःखाचे दिवस सरून सुख दारी येते...खूप सुंदर रचना👍👌✍️🍫🌹

    उत्तर द्याहटवा
  4. अनुभवलं ते सर्व सुंदर शब्दांत वर्णन केलंय तुम्ही! मस्त लिहिलंय!👌👌👌

    उत्तर द्याहटवा

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...