नाती गोती विसरतो...लहान थोर ना ओळखतो,
गर्वाचा बाजार भरला... प्रेमाचा हा शब्दच नाही उरला,
उर्मटपणाचा जन्म झाला,
माणुसकीपणा झाला लुळा पांगळा,
का तर पैसा आहे मोठा......
बालपणीचा तो सखा सोबती,
आठवणीतल्या त्या गोड गमती-जमती,
जरा मदतीसाठी फिरला अवती-भोवती,
मदत न करता अपमान त्याचा केला,
मित्र असूनही एक मित्र हताश होऊन गेला,
का तर फक्त पैसाच आहे मोठा.....
हुशार आहे मुलगा माझा शाळेत भरती त्याची करा,
घेतो शाळेत तेवढी देणगी मात्र भरा,
हुशारीची काही किंमतच नाही राहिली,
विद्यार्थ्यांच्या पैशांनी स्वतःची इमारत मात्र उभारली,
विद्यार्थी पास होताच श्रेय मात्र घ्या,
गुरुदक्षिणा म्हणून आणखी देणगी द्या,
का तर पैसा आहे मोठा...
मतदान येताच गरिबांच्या हाता पाया पडा,
निवडूण येताच मिळतो चांगलाच धडा,
एका कामासाठी सारखे करा ये - जा,
काम न होता फक्त आश्वासन घेऊन या,
शाळा, नोकरी भरतीसाठी पदर त्यांच्याकडे पसरा,
लगेच लावतो तेवढा पैशाचा बंदोबस्त जरा करा,
का तर फक्त पैसाच आहे मोठा....
कोणालाच कोणाचीच जाण नाही.....
नात्याला नात्याच भान नाही,
हाती नसेल पैसा तर शरीरात काही प्राण नाही,
जिकडे तिकडे चालला आहे पैशाचाच खेळ,
नसेल खिशात पैसा तर येते वाईट वेळ,
बहीण-भाऊ, माय-बाप पैसा आहे झाला,
रक्तारक्तात माणसाच्या पैसाच आहे मिसळला,
का तर पैसा,पैसा,पैसा फक्त आणि फक्त पैसा झाला मोठा
*****
*सचिन विश्राम कांबळे*
अप्रतिम लिहिलंयस सचिन 👌🏼👌🏼
उत्तर द्याहटवागणेश दळवी 🙏🏼
खूप धन्यवाद गणेश🙏🙏💐💐💐
हटवाअप्रतिम सुंदर लिखाण सचिन, खुप छान लिखाण
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद दादा🙏🙏💐💐
हटवाअतिशय सुंदर वास्तववादी रचना केली सर👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद🙏🙏💐💐
हटवाखुप छान वास्तव मांडलय...👌👍✍️🍫🌹
उत्तर द्याहटवाखूप खूप छान रचना 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाउत्तम काव्यलेखन!👌👌👌
उत्तर द्याहटवासचिन जीऽ ..!!🙏
उत्तर द्याहटवातुमच्या blogger उपक्रमास खूप खूप शुभेच्छा.🌹
अप्रतिम...! खूपच छान लिखाण.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹